लॉकडाऊनचा केला धैर्याने सामना; उच्चशिक्षित शेतकरी तरुणीने शेतकऱ्यांसमोर निर्माण केला आदर्श

Share

[ad_1]

परभणी; पुढारी वृत्तसेवा : शेतीत नवा प्रयोग म्हणून उभारलेल्या पॉलिहाऊसमध्ये निर्यातक्षम रंगीत सिमला मिरचीचे उत्पादन घेतले. दरम्यान लॉकडाऊन लागला. पण त्याचा धैर्याने सामना करुन स्थानिक बाजारपेठेत या मिरचीला मागणी तयार केली आणि आलेल्या संकटाला धैर्याने सामोरे जात उच्चशिक्षित शेतकरी तरुणीने शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. 

वाचा : व्हर्टिकल फार्मिंगची गरज

सोनपेठ तालुक्यातील शेळगाव महाविष्णू येथे आधुनिक पध्दतीची शेती करण्यासाठी वैष्णवी विष्णूपंत देशपांडे या उच्च शिक्षीत तरुणीने आपल्या कुटुंबियांच्या मदतीने पॉलिहाऊसची उभारणी केली. या पॉलिहाऊसमध्ये नियंत्रीत वातावरणात चांगल्या पध्दतीचे उत्पादन घेतले जाते. यात पिकाचा दर्जा व गुणवत्तापूर्ण चांगले उत्पादन येते. कमी पाणी व आवश्यक तेवढेच खते व किटकनाशक यांचा वापर केला जातो. शक्यतो जैविक खते व किटकनाशके यांचा वापर करुन विषमुक्त भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. या पॉलिहाऊसची बहुतांश कामे ही महिलांच्या माध्यमातून केली जातात. वाफे तयार करणे, ड्रिप अंथरणे, रोपे तयार करणे, झांडांची छाटणी, बांधणी ही सगळी कामे महिलांच्या हाताने वैष्णवीने करुन घेतली आहेत. 

वाचा : इंधन खर्च बचतीसाठीचा सूक्ष्म विचार कसा करावा? 

निर्यातक्षम रंगीत सिमला मिरचीची लागवड पुणे, मुंबई येथील पंचतारांकित हॉटेलला पुरवठा करण्यासाठी केली होती. मिरचीचे चांगले उत्पादन निघाले. मिरची तोडणीला आली आणि राज्यात कडक लॉकडाऊन लागू झाला. सगळी हॉटेल बंद झाली. वाहतूक बंद झाली. तोडणीला आलेला सगळा माल फेकून द्यावा लागतो का काय? अशी परिस्थितीत असताना वैष्णवीने खचून न जाता ही मिरची स्थानिक बाजारात विकण्याचा प्रयत्न केला. पण सिमला मिरचीच्या रंगाबाबत माहिती नसल्याने ग्राहक ही मिरची पिकली असे समजून घेत नव्हते. त्यामुळे वैष्णवी हिने सिमला मिरची तोडून तिचे व्यवस्थित ग्रेडिंग, पँकेजिंग करुन आपले परीचित, मित्र, नातेवाईक यांच्यासह आपल्या महाविद्यालयातील शिक्षक, कोरोना काळात काम करणारे पोलीस, आरोग्य सेवक, कार्यालयीन कर्मचारी, पत्रकार यांना मिरची भेट दिली. पहिल्या तोडणीची जवळपास एक हजार किलो मिरची गिफ्ट पँक करुन तिने वाटली. या भेट दिलेल्या मिरची सोबत तिने या मिरचीचे खाद्यपदार्थ कसे करायचे या बाबतची माहिती पण दिली. तिची ही कल्पना यशस्वी ठरली. ज्यांना मिरची भेट दिली त्यांनी आता या मिरचीची मागणी मोठ्या प्रमाणात केली आहे. वैष्णवीच्या मिरचीला स्थानिक बाजारपेठेसह परळी, बीड, लातूर, परभणी येथूनदेखील मागणी येत आहे. 

वाचा : ट्रॅक्टर शेती, मशागत महागल्याने, शेतकऱ्यांकडून बैलांचा शोध!

सगळीकडे लॉकडाऊनमुळे नुकसान झाल्याची चर्चा असताना वैष्णवी सारख्या तरुण शेतकरी युवतीने आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने आलेल्या संकटाचा धैर्याने सामना करुन समस्येवर मात केली आहे. वैष्णवी सारख्या तरुण शेतकऱ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन तरुण शेतकऱ्यांनी नवनवे प्रयोग करुन समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

वडिलांच्या प्रेरणेने शेती क्षेत्रात आले, कुठल्याही संकटाला धैर्याने तोंड द्यावे व आलेल्या अडचणीचा सामना करावा या वडील विष्णूपंत देशपांडे ह्यांनी दिलेल्या शिकवणीमुळेच लॉकडाऊनचा सामना करता आला. भविष्यात हायड्रोपोनिक्स एरोफोनिक्स या शेतीमधील आधुनिक प्रयोगांची उभारणी आपल्या भागात करायची आहे. आता पॉलिहाऊसमध्ये स्थानिक भाजीपाला घेऊन स्थानिक बाजारपेठेत गोविंद लीला फार्मस या विषमुक्त भाजीपाल्याचा ब्रँण्ड तयार करायचा आहे. या कामात मला आई विजयालक्ष्मी व भाऊ वैभव व वेदांत खूप मदत करतात तर वडील विष्णूपंत देशपांडे यांचे सतत मार्गदर्शन असते. लहान भाऊ वेदांत यांच्या मदतीने वैष्णवी सगळी शेतीची कामे करते. अंग मेहनतीची सगळी कामे करण्यासाठी वेदांत मदत करतो.

– वैष्णवी देशपांडे, युवा शेतकरी, शेळगाव

 

[ad_2]

Source link

Leave a Reply