सभागृहात गदारोळ:भाजप आमदारांचे वागणे गावगुंडाप्रमाणे होते, त्यांनी मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या; महाराष्ट्राच्या संस्कृतिला हे न शोभणारे – भास्कर जाधव

Share

[ad_1]

मुंबईएका तासापूर्वी

  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये यापूर्वी असे कधीच घडलेले नाही

विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता. मात्र पहिल्याच दिवशी प्रचंड गदारोळ सभागृहात पाहायला मिळाला. ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा सुरू असताना विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधीपक्षाच्या आमदारांमध्ये धक्काबुक्कीही झाली. तसेच अध्यक्षांचा माईकही ओढला. यानंतर शिवसेनेचे आमदार आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना भास्कर जाधव म्हणाले की, विरोधी सदस्य आत घुसले त्यांनी मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या. गावगुंडाप्रमाणे या सदस्यांचे वागणे होते. ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. माझ्यासाठी आजचा दिवस हा काळा दिवस आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतिला हे न शोभणारे आहे. महाराष्ट्रात यापूर्वी असे कधीच घडले नव्हते म्हणत भास्कर जाधवांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

जाधव म्हणाले की, ‘महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये यापूर्वी असे कधीच घडलेले नाही. काही आमदारांनी माईक ओढण्याचा प्रयत्न केला. सभागृहात तणाव होत असतात. अशावेळी सत्ताधारी आणि विरोधक बसून तोडगा काढतात. सत्ताधारी विरोधकांवर धावून जातात. मात्र एकदा अध्यक्षांनी कामकाज तहकूब केले तर विषय तिथेच संपत असतो.’

‘सत्ताधारी व विरोधी पक्षांनी दोघांनी मिळून एकत्र येऊन, महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने अधिकाधिक निर्णय कमी वेळात, जास्तीत जास्त निर्णय करून घेणे गरजेचे असते. दोन दिवसांच्या कमी कालावधीच्या अधिवेशनात जास्तीत जास्त सकारात्मक निर्णय करून घेण्याच्या दृष्टीने, सरकार आणि विरोधी पक्ष यांनी एकत्रितपणे काम करणे अपेक्षित आहे मात्र असे होताना दिसले नाही. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर इंपेरिकल डेटा केंद्र सरकारने राज्य सरकारला उपलब्ध करून द्यावा असा ठराव राज्य सरकारने सभगृहामध्ये मांडला. या विरोधात विरोधक आक्रमक झाले. मागासवर्गीय आयोग नेमून तो डाटा राज्य सरकारने मिळवावा असे म्हणत विरोधकांनी घोषणाबाजी केली.

बातम्या आणखी आहेत…

[ad_2]

Source link

Leave a Reply