20 World Cup Schedule From 17th October In UAE Final On 14th November IPL Schedule | 15 ऑक्टोबरला IPL फायनल आणि 17 पासून सुरु होऊ शकतो वर्ल्डकप, 14 नोव्हेंबरला शेवटचा सामना शक्य

Share

[ad_1]

अबुधाबी10 दिवसांपूर्वी

  • कॉपी लिंक

इंडियन प्रीमियर लीग (IPL)चे शिल्लक समाने आणि टी-20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन युएईमध्ये होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यावर्षी 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान आयपीएल सामने होतील. त्यानंतर एक दिवस म्हणजेच 17 ऑक्टोबरपासून टी -20 वर्ल्ड कप खेळला जाऊ शकतो. या 16-संघीय स्पर्धेचा शेवटचा सामना 14 नोव्हेंबरला होणार आहे.

ही बातमी क्रिकेट वेबसाइट ईएसपीएन क्रिकइन्फोने दिली आहे. यानुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(BCCI) ने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ला विश्वचषक युएईमध्ये स्थानांतरित करण्यासाठी पत्र लिहिले आहे.

योजनेनुसार टी-20 वर्ल्ड कपचा पहिला राउंड 8 संघांदरम्यान दोन ग्रुपमध्ये खेळला जाईल. यामध्ये 12 सामने होणार आहेत. या 4 संघांपैकी (दोन्ही गटातील टॉप-2 संघ) सुपर-12 साठी पात्र ठरतील. हे 8 संघ बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी आहेत. या दोन्ही गटांचे सामने UAEआणि ओमानमध्ये होऊ शकतात.

सुपर-12 मध्ये होतील 30 सामने
सुपर-12 राउंड 24 ऑक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. या राउंडमध्ये 2 गटात 12 संघ असतील,जे एकूण 30 सामने खेळतील. हे सर्व सामने दुबई, अबूधाबी आणि शारजाह या तीन ठिकाणी खेळले जाऊ शकतात. 12 संघांपैकी चार संघ पहिल्या राउंडमध्ये पात्र ठरलेले आणि बाकीचे ICC विश्व क्रमवारीतील टॉप-8 संघ असतील. यानंतर तीन प्लेऑफ सामने होणार असून दोन उपांत्य आणि एक अंतिम सामना होईल.

बातम्या आणखी आहेत…

[ad_2]

Source link

Leave a Reply