Archer Praveen’s jadhao arduous journey inspiring: PM Narendra Modi; news and live updates | ​​​​​​​हलाखीच्या परिस्थितीतून ऑलिम्पिकचा पल्ला गाठणाऱ्या तिरंदाज प्रवीणचा खडतर प्रवास प्रेरणादायी : पंतप्रधान

Share

[ad_1]

  • Marathi News
  • Sports
  • Archer Praveen’s Jadhao Arduous Journey Inspiring: PM Narendra Modi; News And Live Updates

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी

  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ‘मन की बात’मध्ये ऑलिम्पिक पात्र खेळाडूंचे कौतुक
  • महाराष्ट्राचा तिरंदाज प्रवीण जाधव टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र

घरची अार्थिक परिस्थिती अधिकच हलाखीची. अाई-वडील दाेघेही मजूर. मात्र, तरीही प्रचंड मेहनतीतून महाराष्ट्राच्या तिरंदाज प्रवीण जाधवने अागामी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न सत्यात उतरवले. प्रचंड मेहनतीने जागतिक स्पर्धेतील सहभागाचा हा पल्ला गाठणारा प्रवीण हा सर्वांसाठी प्रेरणादायी अाहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी युवा तिरंदाज प्रवीण जाधवचे खास काैतुक केले. त्यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये प्रवीणच्या मेहनतीची खास स्तुती केली.

गुणवत्तेला समर्पण अाणि मेहनत करण्याच्या इच्छाशक्तीची साथ मिळाली की अनेक अाव्हानेही सहज पेलता येतात. यासाठी जिद्द अाणि कष्ट करण्याची तयारी असावी लागते. याचाच प्रत्यय ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या भारतीय खेळाडूंनी अाणून दिला. त्यामुळे या सर्वांची मेहनत ही अापणा सर्वांसाठी सकारात्मक अशी ऊर्जा निर्माण करणार अाहे, असेही पंतप्रधान माेदी म्हणाले.

फेन्सर भवानीदेवीसह नेहा अाणि दीपिकाचेही काैतुक; सर्वांना पाठबळ देण्याचे अावाहन
पंतप्रधान माेदी यांनी अापल्या कार्यक्रमादरम्यान तलवारबाजपटू भवानीदेवी, तिरंदाज दीपिकाकुमारी अाणि नेहाचेही खास काैतुक केले. अापल्या कामगिरीमध्ये सातत्य ठेवत या सर्वांनी ऑलिम्पिकमधील अापला प्रवेश निश्चित केला. या सर्वांना पाठबळ देण्याचेही त्यांनी नागरिकांना अावाहन केले.

ऑलिम्पिक पदकाचा प्रवीणला विश्वास; कामगिरीत सातत्य ठेवण्यासाठी सराव
अागामी टाेकियाे ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान पदकाचा बहुमान मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत करत अाहे. अातापर्यंतच्या अांतरराष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत पदकाचा बहुमान मिळवता अाला. अाता याच उल्लेखनीय खेळीमध्ये सातत्य ठेवताना अाॅलिम्पिकमध्ये पदक जिंकणार अाहे, असा विश्वास तिरंदाज प्रवीण जाधवने व्यक्त केला. पुणे येथील शिबिरात त्याने तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अाॅलिम्पिकसाठी कसून सराव केला.

बातम्या आणखी आहेत…

[ad_2]

Source link

Leave a Reply