[ad_1]
चंदीगड14 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

- या वजन गटात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बजरंगचा रशियात सराव
जागतिक दर्जाच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ६५ किलाे हा सर्वात अाव्हानात्मक असा वजन गट अाहे. यात सहभागी सर्व मल्ल हे प्रचंड ताकदीचे अाणि किताबाचे प्रबळ दावेदार मानले जातात. प्रत्येकामध्ये तगडे अाव्हान माेडीत काढण्याची प्रचंड क्षमता असते, याच गटात अाता मी पहिल्यांदाच अाॅलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत अाहे. यात पदक जिंकण्याचा प्रयत्न असेल, असा विश्वास कुस्तीपटू बजरंग पुनियाने दिव्य मराठीशी बाेलताना व्यक्त केला. भारताचा हा मल्ल सध्या रशियामध्ये अागामी टाेकियाे अाॅलिम्पिकची तयारी करत अाहे.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सर्वाधिक अाव्हान काेणाचे?
टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्ती प्रकारात ६५ किलाे वजन हा अधिक कठीण मानला जाताे. जागतिक दर्जाचे अत्यंत कसलेेले मल्ल या गटात अापले नशिब अाजमावतात. प्रत्येकामध्ये तगडे अाव्हान सहजपणे माेडूत काढण्याची क्षमता असते. यासाठी लागणारी प्रचंड मेहनत ही प्रत्येकानेच केलेली असते. त्यामुळे या गटातील प्रत्येक फेरीतील विजय हा त्या मल्लाची क्षमता सिद्ध करणारा ठरताे. माझ्या मते त्यामुळे अाॅलिम्पिक स्पर्धेत हाच वजन गट सर्वाधिक अाव्हान देणारा अाहे. अाता याच गटात मी उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील अाहे.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील अनेक पदके जिंकली, आता ऑलिम्पिक पदकासाठी कशी तयारी?
ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व करणे, हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. अाता माझी या स्पर्धेबाबतची स्वप्नपूर्ती झाली अाहे. वर्ल्ड, एशियन, कॉमनवेल्थ स्पर्धेत अातापर्यंत पदके जिंकली. मात्र, अाता अाॅलिम्पिक पदकाचा बहुमान मिळवण्यासाठी मी खास रशियात सराव घेत अाहे. हा पदकाचा पल्ला गाठण्यासाठी मी कसून मेहनत घेत अाहे. याचा मला निश्चित असा माेठा फायदा हाेईल.
ऑलिम्पिक पदकासाठी काेणाकडून प्रेरणा?
मला अातापर्यंत अनेकांकडून प्रेरणा मिळत अाहे. त्यामुळे मला हा पात्रतेचा पल्ला यशस्वीपणे गाठता अाला. त्यामुळे खास करून मला जाॅर्डन बेराेजकडून अधिक प्रेरणा मिळते. याशिवाय हसन याजदानीकडूनही मला माेठ्या प्रमाणात प्रेरणा मिळते अाहे. हे दाेघेही ८६ किलाे वजन गटातील पदक विजेते अाहेत. ते मला सातत्याने कामगिरीचा दर्जा उंचावण्यासाठी मार्गदर्शन करत असतात. यातून मला सर्वाेत्तम अशा प्रकारचे डावपेच तयार करता अाले अाहे. तसेच दुबळी बाजू अधिक बळकट करण्यासाठीही ते सखाेल पद्धतीने मार्गदर्शन करतात.
कोरोनाचा ऑलिम्पिक तयारीवर काही परिणाम?
सुरुवातीचे १० महिने अधिक कठीण हाेते. मात्र, अाता यातून सर्वच खेळाडू हळूहळू सावरत अाहेत. कुस्ती हा शारीरिक संपर्काचा खेळ अाहे. त्यामुळे अामच्या सारख्या कुस्तीपटूंना काेराेना महामारीचा माेठा फटका बसला. यातून सराव बंद पडले हाेते. मात्र, अाम्ही सर्व जण घरीच सराव करत हाेताे. अाता परिस्थिती अाटाेक्यात अाली. मात्र, तरीही अाम्ही खबरदारी घेत अाहाेत.
रोम सिरीजमधील सुवर्णपदकाचा कामगिरीवर कसा परिणाम पडणार?
राेम रॅकिंग सिरीजमधील सुवर्णपदक हे माझ्यासाठी फार महत्त्वाचे अाहे. यातून माझा अात्मविश्वास द्विगुणित झाला अाहे. त्यामुळे अाता अाॅलिम्पिक स्पर्धेतील पदक जिंकण्याचाही विश्वास निर्माण झाला अाहे. यातून हा पल्ला गाठण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार अाहे.
[ad_2]
Source link