जावेद दुलेखाँन आत्तार बेस्ट अ‍ॅक्टीविस्ट ऑफ द मंथ, ऑगस्ट २०२१

Share
जावेद दुलेखाँन आत्तार बेस्ट अ‍ॅक्टीविस्ट ऑफ द मंथ, ऑगष्ट २०२१
जावेद दुलेखाँन आत्तार बेस्ट अ‍ॅक्टीविस्ट ऑफ द मंथ, ऑगष्ट २०२१

जावेद दुलेखाँन आत्तार हे मु.पो. पिंपोडे ता. कोरेगांव जि. येथील रहिवासी आहेत. माहिती अधिकार कायदा उत्तम रीतीने कसा वापरावा ? याचं उत्तर जावेद आत्तार हे त्यांच्या कामामधून देत असतात. स्वत:चा रोजगार व व्यवसाय सांभाळून समाजातील घडामोडीवर व आसपासच्या परिसरावर त्यांच बारीक लक्ष असतं. शिकारी माणसाला वाघ दिसला की त्याचा हात आपोआप खांद्यावरील बंदुकीकडे जातो. तसच समाजात समस्या दिसली की जावेद आत्तार यांची बुद्धी माहिती अधिकार या विषयावर विचार करायला लागते.

आपल्या सभोवताली सामान्य माणसांचे खूप अडलेले प्रश्न असतात. सरकारी कार्यालयात सामान्य माणसं चकरा घालून दमून जातात. अशा अडकलेल्या माणसांना मदत करून माहिती अधिकार वापरून त्यांच्या समस्या सोडवून देण्यात सहकार्य

करणं यासाठी जावेद आत्तार नेहमी प्रयत्नशील असतात. सरकारी अधिकारी यांच्या कागदपत्रातील कामकाजातील त्रूटी व चूका यांवर नेमके बोट ठेवून त्यांना नियमाने काम करण्यास भाग पाडा या कामात जावेद आत्तार हे माहिर आहेत.

सरकारी यंत्रणेला पत्र, तक्रार, मागणी व सूचना करण्यासाठी आपणास ड्राफ्ट लेखन करावे लागते. जावेद यांच्याकडे उत्तमः लेखनकला आहे. अन्य कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडून हा आदर्श घेतला पाहिजे.

जावेद आत्तार यांची विचार सरणी ही मुक्त व उदारमतवादी आहे. रमजान मध्ये लॉकडाऊन उठवू नका. त्यामुळे कोविड वाढेल. आपण सुखरूप व जिवंत राहिलो तर पुढे कितीतरी रमजान येतील ते आपण त्यावेळी आनंदाने व पवित्र मनाने करू अशी जी त्यांनी भूमिका घेतली ती खरंच कौतुकास्पद अशी होती.

माहिती अधिकारांचा वापर करणं हे हिंमतबाजांचे काम आहे. यात काही लोकांचे हितसंबंध दुखावू शकतात. असे लोक मग कार्यकर्त्यांना त्रास देतात. असाच अनुभव जावेद आत्तार यांनाही आलेला आहे.

त्यांच्या शेतातील पाईप लाईन चे अशा समाजकंटकांनी नूकसान केलं पण जावेद आत्तार अशा लोकांपुढे नमले नाहीत. व भविष्यातही कधी नमणार नाहीत. जावेद आत्तार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अतिशय उत्तम पद्धतीने सोशल मिडीयाचा वापर करतात.

नव नवीन माहिती

अन्य कार्यकर्त्यांनी त्यांचा हा आदर्श घेतला पाहिजे. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ वाढला पाहिजे म्हणून ते सतत प्रयत्न करीत असतात. त्यांच्याकडे त्यासाठी अनेक कल्पना तयार असतात.

जावेद आत्तार यांना माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचा बेस्ट मंथ ऑफ ऑगष्ट २०२१ हा पुरस्कार जाहिर होत आहे.

एक उत्तम कार्यकर्ता, उत्तम संघटक, उत्तम माणूस चांगला मित्र आणि जबाबदार व दक्ष नागरिक म्हणून जावेद आत्तार यांनी त्यांची ओळख निर्माण केलेली आहे.

शेवटी जावेद ला मी एकच म्हणेन.

रुक जाना नही, तू कही हार के,

काँटों से गुजरकर साबे मिलेंगे बहार के


सामाजिक कार्यकर्ता क्षेत्रात जावेद आत्तार यांचा उत्तुंग उत्कर्ष व्हावा. अशा लाख लाख शुभेच्छा !

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती अधिकार अर्ज ऑनलाईन कसा करावा

This Post Has 3 Comments

Leave a Reply