[ad_1]
- Marathi News
- Sports
- Bhagyashree Jadhav Of Nanded Selected For Paralympics; Maharashtra’s Only Female Player In The National Team; News And Live Updates
नांदेड13 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

टोकियो येथे ऑगस्टमध्ये होणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. नांदेडच्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव गोळाफेकमध्ये एफ ३४ या प्रकारात पॅरालिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल. महाराष्ट्रातून राष्ट्रीय संघात निवड झालेली एकमेव महिला दिव्यांग खेळाडू आहे. नवी दिल्ली येथे २९ व ३० जून रोजी पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड चाचणी घेण्यात आली. या चाचणीनंतर २४ जणांची भारतीय संघात निवड करण्यात आली. त्यातील ४ महिला खेळाडूमध्ये भाग्यश्रीला संधी मिळाली.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवडज येथील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भाग्यश्रीने अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिल्हा, राज्य, राष्ट्रीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, कांस्य पदकांची कमाई केली होती. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या चीन येथील जागतिक पॅरा ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धेत तिने भारतासाठी २ कांस्यपदके जिंकली.
२०२१ मध्ये दुबई येथे झालेल्या फाजा पॅरा अथेलेटिक्स ग्रँडप्रिक्स या जागतिक स्पर्धतदेखील तिने गोळाफेकमध्ये रौप्यपदक, तर भालाफेक या क्रीडा प्रकारात तिने कांस्यपदक मिळवून भारताची शान राखली होती. ऑलिम्पिक व एशियन क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याचे तिचे तिचे स्वप्न होते. खांद्याला जबर दुखापत झाल्यानंतरही तिने आपले लक्ष्य गाठण्यासाठी संघर्ष कायम ठेवला. स्पर्धेत पदक जिंकण्याचा विश्वास तिने व्यक्त केला.
[ad_2]
Source link