Changes in the Test Championship scoring system; 12 points after winning the match; news and live updates | टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणांकन पद्धतीत बदल; सामना जिंकल्यानंतर १२ गुण

Share

[ad_1]

  • Marathi News
  • Sports
  • Changes In The Test Championship Scoring System; 12 Points After Winning The Match; News And Live Updates

दुबई5 दिवसांपूर्वी

  • कॉपी लिंक
  • सामन्यातील विजय: 12 गुण. टाय : 6 गुण . ड्रॉ: 4 गुण

कसाेटी क्रिकेटला चालना देण्यासाठी अाणि प्रेेक्षकांचा कल वाढवण्यासाठी पुन्हा एकदा अायसीसीने नवा प्रयाेग साकारण्यासाठी पुढाकार घेतला. यातून अायसीसीने अाता कसाेटी चॅम्पियनशिपमधील गुणांकन पद्धतीमध्ये सकारात्मक असा बदल केला. यामुळे कसाेटी सामना जिंकणाऱ्या संघाला १२ गुणांची कमाई करता येणार अाहे.

भारत अाणि न्यूझीलंड यांच्यातील फायनलनंतर नुकतेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे पहिले सत्र यशस्वीपणे पार पडले. यादरम्यान सर्वाधिक गुणांसह दाेन्ही संघांनी फायनलचा पल्ला गाठला हाेता. अाता या गुणांच्या पद्धतीतील बदल हा अागामी सत्रापासून लागू हाेणार अाहे. ‘प्रत्येक मालिकेतील १२० गुणांच्या जागी अाता बदल झाला. त्यानुसार पुढच्या सत्रापासून प्रत्येक सामन्यानुसार हे गुण दिले जातील. त्यामुळे हा नवा बदल संघांसाठी अधिक फायदेशीर ठरेल.

यातून कसाेटीची लाेकप्रियता कायम राहील व संघही या चॅम्पियनशिपमध्ये उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असतील, अशी प्रतिक्रिया अायसीसीच्या एका सदस्याने दिली. कसाेटी सामन्यादरम्यानची संथ गाेलंदाजी ही संबधित संघाला महागात पडू शकेल. यातून त्या संघाच्या प्रत्येकी एका षटकानुसार एका गुणाची कपात केली जाईल.

भारत-इंग्लंड मालिकेने सत्राची सुरुवात
येत्या ४ अाॅगस्टपासून भारत अाणि यजमान इंग्लंड हे दाेन्ही संघ कसाेटी मालिकेसाठी समाेेरासमाेर येणार अाहेत. या दाेन्ही संघांमध्ये पाच कसाेटी सामन्यांची मालिका रंगणार अाहे. याच मालिकेतून अायसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात हाेणार अाहे. त्यामुळे या मालिकेपासून गुणदान पद्धत लागू करण्याचा निर्णय अायसीसीने घेतला.

बातम्या आणखी आहेत…

[ad_2]

Source link

Leave a Reply