Divya marathi today editorial 1 july 2021 | चीनविरुद्ध आक्रमक संरक्षणाचा पवित्रा

Share

[ad_1]

5 दिवसांपूर्वी

  • कॉपी लिंक

तैवानभोवतालच्या लष्करी हालचाली चीनने वाढवल्याने जगाचे लक्ष तिकडे वेधले आहे. त्याचबरोबर भारताच्या उत्तर सीमेवर चीनने सैन्याची मोठी जमवाजमव केल्याने याकडेही लक्ष वेधले गेले. गतवर्षीच्या तणावानंतर फेब्रुवारीमध्ये चीनशी सैन्य माघारीचा करार झाला. त्यानंतर काही दिवस तणाव थोडा कमी झाला. पण, ठरल्याप्रमाणे चीनने सैन्य माघारी नेले नाही. उलट बर्फातल्या युद्धाचा सराव त्यांचे सैनिक करत होते. चीनने लष्करी कुमक जमवल्याने आता तणाव आणखी वाढला आहे.

भारतानेही जवळपास दोन लाख सैनिक उत्तर सीमांवर उभे केले आहेत. लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या सीमेवर भारत-चीनचे सैन्य उभे ठाकले आहे. एकीकडे दोन्ही बाजूच्या लष्करी अधिकाऱ्यांची बोलणी, तर दुसरीकडे सैन्याची जमवाजमव, असा विरोधाभास सीमेवर आहे. १९६२ नंतर सीमेवर तणावाची स्थिती निर्माण होण्याची ही आठवी वेळ. सैन्याच्या जमवाजमवीमुळे तणाव यंदा वाढला आहे. छोटी ठिणगी पडली तरी तीव्र संघर्ष होऊ शकतो. त्याची तयारी करताना भारताने आजवरच्या पवित्र्यात बदल केला आहे. आक्रमण, घुसखोरी करू पाहणाऱ्या चीनला थोपवणे, ही भारताची भूमिका असायची.

आता केवळ बचावात्मक पवित्रा न घेता आक्रमणात्मक संरक्षण करण्याचे भारताने ठरवल्याचे व्यूहरचनेवरून दिसते. जमिनी, हवाई, सागरी संघर्षाची भारताची तयारी आहे. चीन भारताला सतत संघर्षाच्या तणावात ठेवणार. यापुढे संघर्षाची क्षेत्रे वाढणार. औद्योगिक, व्यापारविषयक कोंडी, सायबर हल्ले अशा चिनी हल्ल्यांना तोंड देण्याची तयारी ठेवावीच लागेल. त्याचबरोबर अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया या राष्ट्रांबरोबर राजनैतिक हालचालीही कराव्या लागतील. अफगाणमधील लष्करी संघर्षात भारताने उतरावे, यासाठी अमेरिका दबाव टाकते आहे. अमेरिकेची मदत घेताना भारताने तिचे प्यादे बनू नये.

बातम्या आणखी आहेत…

[ad_2]

Source link

Leave a Reply