India Vs New Zealand WTC Final LIVE Score: Rohit Sharma Virat Kohli Kane Williamson | NZ Vs IND Test Championship Final Latest News Photo Update | भारतीय गोलंदाजांचे कमबॅक; पावसाच्या व्यत्ययाने लढतीवर अनिर्णीत अवस्थेचे ढग

Share

[ad_1]

  • Marathi News
  • Sports
  • India Vs New Zealand WTC Final LIVE Score: Rohit Sharma Virat Kohli Kane Williamson | NZ Vs IND Test Championship Final Latest News Photo Update

साऊदम्पटन13 दिवसांपूर्वी

  • कॉपी लिंक
  • भारताच्या दिवसअखेर 2 बाद 64 धावा; 32 धावांची आघाडी; आज राखीव डेला होणार खेळ

भारतीय संघाने शमी (४/७६), इशांत (३/४८) यांच्या भेदक माऱ्यातून टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडला पहिल्या डावात २४९ धावांवर राेखले. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात मंगळवारी पाचव्या दिसअखेर २ गड्यांच्या माेबदल्यात ६४ धावा काढल्या. यासह भारताला ३२ धावांची अाघाडी घेता अाली. भारताचा कर्णधार विराट काेहली (८) व पुजारा (१२) मैदानावर कायम अाहे. न्यूझीलंडकडून साऊथीने २ बळी घेतले.

टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला पाचव्या दिवशी पुन्हा एकदा पावसाचा फटका बसला. तासभर उशीराने सुरुवात झालेल्या खेळात भारतीय संघाच्या गाेलंंदाजांनी दमदार पुनरागमन करत न्यूझीलंडचा माेठ्या अाघाडीचा प्रयत्न हाणुन पाडला. भारताकडून ईशांत शर्माने ३ शमीने ४ व अश्विनने २ विकेट घेतल्या. सध्या पावसाच्या व्यत्ययाने या कसाेटी सामन्यावर अनिर्णीत अवस्थेचे ढग निर्माण झाले अाहेत. न्यूझीलंडने २ बाद १०१ धावांवरून खेळण्यास सुुुरुवात केली. भारताच्या शमीने युवा खेळाडू गीलकरवी न्यूझीलंडच्या टेलरला झेलबाद केले. गीलने घेतलेला टेलरचा झेल लक्षवेधी ठरला.

साऊथीचे ६०० बळी पुर्ण
टीम साऊथीने दुसऱ्या डावात २ बळी घेतले. यासह त्याने अांतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० विकेट पुर्ण केल्या. असे करणारा ताे न्यूझीलंडचा पहिला गाेलंदाज ठरला.

वाॅल्टिंगची पहिल्या डावात निराशा
करिअरमधील अापली शेवटची कसाेटी माेठ्या खेळीतून गाजवण्याची वाॅल्टिंगला (१) अाशा हाेती. मात्र, त्याची पहिल्या डावात निराशा झाली. शमीने त्रिफळा उडवून त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यामुळे ३ चेंडूंंत १ धाव काढून वाल्टिंग माघारी परतलाा. यातून ताे शेवटच्या कसाेटीच्या पहिल्या डावात माेठी खेळी करण्यात अपयशी ठरला.

अाज राखीव दिवशी ९८ षटके
पावसाचा व्यत्यय कायम असल्याने या कसाेटी फायनलचा खेळ राखीव दिवशीही हाेण्याची शक्यता अाहे. यासाठी कसाेटीपुर्वीच अायसीसीने २३ जून हा राखीव दिवस निश्चित केलेला अाहे. दिवसभरात ९८ षटकांचा खेळ हाेऊ शकताे.

सूर मारत 0.88 सेकंदापर्यंत हवेत राहून शुभमान गिलने टेलरचा झेल घेतला.

बातम्या आणखी आहेत…

[ad_2]

Source link

Leave a Reply