India’s experienced middle order flops in front of Kiwi bowlers; Jaspreet Bumrah’s failure hits the final; news and live updates | किवीच्या गोलंदाजांसमोर भारताची अनुभवी मधली फळी फ्लॉप; जसप्रीत बुमराहच्या अपयशाचा फायनलमध्ये फटका

Share

[ad_1]

  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • India’s Experienced Middle Order Flops In Front Of Kiwi Bowlers; Jaspreet Bumrah’s Failure Hits The Final; News And Live Updates

11 दिवसांपूर्वी

  • कॉपी लिंक
  • भारतीय संघ तिन्ही क्षेत्रात पिछाडीवर, विलियम्सकडे तयार होते पर्यायी नियोजन

आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताला ८ गड्यांनी पराभूत केले. या निकालामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींची निराशा झाली. अंतिम सामन्यात न्यूझीलंडने गाेलंदाजी, फलंदाजी व क्षेत्ररक्षणात भारताला मात दिली. तुलनेत भारताचे खेळाडू फलंदाजी व गोलंदाजीसह क्षेत्ररक्षणातही पुर्णपणे अपयशी ठरले. चौथ्या डावात विल्यम्सन व टेलरचे सोपे झेल सुटले खरे तरी भारत सर्वात यशस्वी संघ होता. यातून यजमान ऑस्ट्रेलियाला हरवले होते. त्यानंतरही संघ न्यूझीलंडसमोर अंतिम सामन्यात टिकू शकला नाही.

गोलंदाजी : किवीची चौकडी भारतीय फलंदाजांना अडचणीची
न्यूझीलंडची जेमिसन, साउथी, बोल्ट व वॅगनर ही गोलंदाजांची चाैकडी भारतीय फलंदाजांना अडचणीची ठरली. त्यांना या चाैकडीला दमदार उत्तर देता अाले नाही. दुसरीकडे, भारतीय प्रमुख वेगवान गोलंदाज बुमराह अपयशी ठरला. त्याचा मोठा परिणाम जाणवला. जडेजाला गोलंदाजीत संधी मिळाली नाही व फलंदाजीत ताे अपयशी ठरला.

फलंदाजी : भारतीय संघाची मधल्या फळीकडून निराशा
पहिल्या डावात चांगली सुरुवात करणारे राेहित व गिल दुसऱ्या डावात अपयशी ठरले. अनुभवी मधल्या फळीत चेतेश्वर पुजारा, विराट, रहाणे मोठी खेळी करू शकले नाहीत. न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी पहिल्या डावात उत्कृष्ट कामगिरी केली. तळातील खेळाडूंनी महत्त्वाचे योगदान दिले. त्यामुळे न्यूझीलंडला भारतावर मात करता अाली.

नेतृत्व : विजयाच्या गांभीर्याने केली आक्रमकतेवर सहज मात
विलियम्सनचे विजेतेपदासाठीचे गांभीर्य अंतिम सामन्यात काेहलीच्या अाक्रमक खेळीवर मात करणारे ठरले. दोघांच्या स्वभावात बराच फरक आहे. विलियम्सन शांत तर विराट आक्रमक आहे. विलियम्सनकडे प्रत्येक परिस्थितीत पर्यायी नियोजन तयार दिसले. परिस्थितीचा वेध घेऊन त्याने अत्यंत सुरेख पद्धतीने या नियाेजनाचा वापर केला.

तीन सामन्यांच्या मालिकेतून विजेता ठरवा : काेहली
भारतीय कर्णधार विराट कोहलीने पराभवानंतर आयसीसीच्या नियमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याच्या मते, एका सामन्याद्वारे सर्वोत्कृष्ट संघाचा निर्णय होऊ शकत नाही. त्यासाठी तीन सामन्यांची मालिका घ्यायला हवी. तीन कसोटीच्या मालिकेत दोन्ही संघाला चुका सुधारण्याची संधी मिळते,असे ताे म्हणाला. इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी हीच गोष्ट सांगितली होती, हे विशेष.

बातम्या आणखी आहेत…

[ad_2]

Source link

Leave a Reply