
कोविड काळातील आर्थिक संकटातून उभं करण्यासाठी अनुदान देण्यास मान्यता
मुंबई, दि. ५ : राज्यातील शेकडो लोक कलावंत, लोक कलाकार, लोककला पथकांचे चालक, मालक, निर्माते यांना कोविड आर्थिक संकटाला मोठे तोंड द्यावे लागले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या समवेत एक बैठक पार पडली यात मुख्यमंत्र्यांनी कलाकारांसाठी एकरकमी कोविड दिलासा पॅकेज देण्यास मान्यता दिली असून कलाकारांना ५ हजारची मदत यासंदर्भात विस्तृत प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर लगेच आणावा असे निर्देश दिले आहेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेदेखील सांस्कृतिक कार्यमंत्री देशमुख यांची एक बैठक झाली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थान येथे सांस्कृतिक कार्य विभागाशी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक मनीषा वर्मा, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपथित होते यात कलाकारांना ५ हजारची मदत जाहीर केली आहे.
गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्र कोविड संसर्गाशी लढा देत आहे. राज्यातील कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यात सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली असल्याने अनेक कलाकारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. हे लक्षात घेऊन राज्यातील 56 हजार कलाकारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घोषणा केली.
56 हजार कलाकारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत
राज्यात सध्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे येथे जवळपास 8 हजार कलाकार असून राज्यात उर्वरित जिल्हयात जवळपास 48 हजार कलाकार आहेत. या सर्व कलाकारांना प्रति कलाकार 5 हजार रुपये मदत देण्यात येणार असून यासाठी जवळपास 28 कोटी रुपये खर्च होणार आहे.
नव नवीन माहिती
- शिक्षक ग्रामसेवकांच्या विरोधात आंदोलन करतो म्हणून मारहाण कांगोणीच्या सरपंचासह ९ जणांवर गुन्हा दाखल.
- RTI महासंघची मागणी प्रत्येक शासकीय कार्यालयात शासनाच्या सर्व परिपत्रकांची काटेकोर अंमलबजावणी करावी
- RTI कलम ४ ख २१ दिवसात अद्यावत करा अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा
- माहिती अधिकार कार्यकर्ता मेळावा पुणे येथे संपन्न
- एकलहेरा ग्रामसेवकला माहिती अधिकाराचा दणका माहिती नाकारणे भोवले तत्कालीन ग्रामसेवक श्री. गायकवाड यांना ५०००/- रु दंड.
समूह लोककलापथकांचे चालक मालक आणि निर्माते यांनाही एकरकमी विशेष कोविड अनुदान पॅकेज
राज्यात प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात विविध कलापथके कार्यरत आहेत. कोविडमुळे वर्षभरात प्रयोग न झाल्याने त्यांच्यापुढे आर्थिक संकट उभे असून शाहिरी, खडीगंमत, संगीतबारी, तमाशा फड पूर्णवेळ, तमाशा फड- हंगामी, दशावतार, नाटक, झाडीपट्टी, विधीनाट्य, सर्कस आणि टुरींग टॉकीज अशा जवळपास 847 संस्थांतील कलाकारांना मदत करण्यात येणार असून यासाठी 6 कोटी रुपये खर्च होणार आहे. याशिवाय राज्यातील कलाकारांचे सर्वेक्षण, कलाकार निवड आणि इतर अनुषंगिक खर्च यासाठी 1 कोटी रुपये खर्च होणार असल्याचे सांस्कृतिकमंत्री श्री.देशमुख यांनी सांगितले
हे वाचले का?
- आपलं काम कुठे आणि कुणामुळे अडलंय याची माहिती अशी करून घ्या !
- जावेद दुलेखाँन आत्तार बेस्ट अॅक्टीविस्ट ऑफ द मंथ, ऑगस्ट २०२१
- सात दिवसांत अर्ज/फाइल वर काम होणार नाही तर अधिकारी यांच्यावर कारवाई होणार महाराष्ट्र सरकारचा निर्णय
- राज्यातील लॉकडाऊन उठणार पाच स्तरात उठणार आपला जिल्ह्यांची माहिती पहा
- ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांचे पद रद्द कधी होते? चला तर मग समजावून घेऊया.
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा