[ad_1]
- Marathi News
- Sports
- Kolhapur’s Rahi World Champion; Rahila 25 M. Gold Medal In Rapid Fire Pistol; News And Live Updates
ओसिजेक7 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

- 39 गुणांसह सुवर्ण; एका गुणाच्या पिछाडीने विश्वविक्रम हुकला
काेल्हापूरची अव्वल नेमबाज राही सरनोबत सोमवारी विश्वविजेती ठरली. तिने क्रोएशियात अायाेजित अायएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाचा वेध घेतला. अाॅलिम्पिक काेेटा हाेल्डर राहीने महिलांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. तिने फायनलमध्ये ३९ गुणांची कमाई केली. यादरम्यान अवघ्या एका गुणाच्या पिछाडीने तिचा विश्वविक्रमाला गवसणी घालण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. राहीच्या साेनेरी कामगिरीनंतर भारतीय संघाला स्पर्धेत सुवर्णपदकाचा बहुमान मिळाला. महाराष्ट्राची अव्वल नेमबाज राही सरनोबत ही अाता आगामी टाेकियाे अाॅलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार अाहे.
ती सलग दुसऱ्यांदा अाॅलिम्पिक स्पर्धेत सहभागी हाेणार अाहे. भारताची युवा नेमबाज मनू भाकर अापल्या गटात अपयशी ठरली. सुमार खेळीमुळे तिला ११ गुणांची कमाई करता अाली. यातून ती या गटामध्ये सातव्या स्थानी राहिली. पात्रता फेरीमध्ये राहीने ५९१ गुणांसह दुसरे स्थान गाठले. यात ५८८ गुणांसह मनू भाकर ही तिसऱ्या स्थानी राहिली. त्यानंतर राहीने अापल्या कामगिरीचा दर्जा उंचावत फायनलमध्ये सुवर्णपदकाचा वेध घेतला. मनूचा पदकाचा प्रयत्न अपुरा ठरला.
अाॅलिम्पिक पदकाचा दावा मजबूत
कामगिरीमध्ये सातत्य ठेवणाऱ्या राही सरनाेबतने अाता विश्वचषकातील साेनेरी यशातून अागामी टाेकियाे अाॅलिम्पिक स्पर्धेतील अापला पदकाचा दावा मजबूत केला. तिने दुसऱ्यांदा अाॅलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळवली. त्यामुळे अाता दुसऱ्या प्रयत्नामध्ये पदकाचा पल्ला गाठण्यावर तिची नजर असेल. काेराेना महामारी अाणि लाॅकडाऊनच्या काळात कसून सराव करत तिने अाता विश्वचषकात पदकाचा वेध घेतला. त्यामुळे भारतीय संघाला तिच्याकडून अाॅलिम्पिक स्पर्धेतही पदक जिंकण्याच्या उल्लेखनीय कामगिरीची माेठी अाशा अाहे. तिनेही अापल्या खेळीचा दर्जा उंचावत पदकाचा दावा मजबूत केला.
भारतीय संघाचे स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक; अातापर्यंत ४ पदके नाेंद
काेल्हापूरच्या राही सरनाेबतने भारतीय संघाला साेमवारी विश्वचषकात पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. यासह अाता या स्पर्धेत भारताच्या नावे चौथ्या पदकाची नाेंद झाली. यामध्ये प्रत्येकी एका सुवर्ण-राैप्यसह दाेन कांस्यपदकांचा समावेश अाहे. मनू-साैरभ चाैधरीने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र गटात राैप्यपदक पटकावले. तसेच महिला संघाने सांघिक गटात कांस्यपदकाची कमाई केली. साैरभने १० मीटर एअर पिस्तूलच्या वैयक्तिक गटात कांस्यपदक पटकावले.
[ad_2]
Source link