विना हेलमेट फोटो व्हिडिओ काढल्याने पत्रकार ला शिव्या व मारण्याची धमकी

Share
महिलांवर ई-चालान सहित गुन्हे दाखल पत्रकार यांचा पाठपुराव्यास यश.
महिलांवर ई-चालान सहित गुन्हे दाखल पत्रकार यांचा पाठपुराव्यास यश.

मसूब च्या दोन्ही महिलांवर ई-चालान सहित गुन्हे दाखल पत्रकार यांचा पाठपुराव्यास यश.

खापरखेडा :- विना हेलमेट दुचाकी वाहन चालवित असल्याने तक्रार करण्यासाठी पुरावें म्हणून फोटो व्हिडिओ घेणाऱ्या त्या पत्रकार यांना व्हिडिओ डिलीट न केल्यास शिव्या देवून मारण्याची धमकी देने व मोबाइल हिस्काविन्याचा प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र सुरक्षा बल मध्ये कार्यरत त्या दोन्ही महिला रक्षकांवर सदर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. सोबतच नागपुर वाहतूक शाखाने त्या दोघीवर 500- 500 रु ई- चालानची कार्यवाही सुद्धा केली आहे.

तक्रारदार चंद्रभान उर्फ शेखर कोलते हे खापरखेडा येथील रहिवासी असून नागरिक हक्क संरक्षण या साप्ताहिक न्यूजपेपरचे उपसंपादक व क्राइम पत्रकार सुद्धा आहेत. 24 जून 2021, गुरुवार रोजी दुपारी तीनच्या सुमारास पत्रकार कोलते हे एलआईसी चौकाच्या ट्रैफिक सिग्नल कडून दुचाकीने जात असताना त्यांना पोलिसांसारखी खाकी वर्दीधारक दोन महिला स्कूटी नं – MH 40 AP 8502 आणि स्कूटी नं – MH 40 BU 4642 या दुचाकी वाहनाने हेल्मेट परिधान न करता (विना हेलमेट ) जातानां दिसले.

हा प्रकार नियमबाह्य वाटले असता ट्रैफिक पोलीस विभाग नागपुर शहर यांच्या तक्रार प्रणालीसाठी असलेल्या 90113 87100 या वॉटसअप मोबाइल क्रमांक वर पुरावे सहित तक्रार करण्यासाठी कोलते यांनी मागून त्या दोन्ही दुचाकी वाहनाचा क्रमांक सहित मोबाइलद्वारे व्हिडिओ व फोटो घेतले.

मोबाइल द्वारे फोटो व्हिडिओ घेतल्याने व कार्यवाहीच्या भीतीमुळे त्या महिला रक्षकांनी कोलते यांना अडवून व्हिडिओ व फोटो त्वरित डिलीट करण्यास धमकावले. कोलतेनी त्यांना उपसंपादक व पत्रकार म्हणून आपला परिचय दिला तेंव्हा त्यातील एका महिलेने उद्धटपणे वागून व ‘भाडित गेला पत्रकार ‘ अशे पत्रकारितेविषयी उपशब्द वापरून शिव्या दिल्या.

सोबतच ‘ तो व्हिडिओ डिलिट कर लवकर, नाहीतर कनपट शेकिन ‘ अशे शब्द उच्चारण करीत मारण्याची धमकी देत कोलते यांचा मोबाइल व वाहनाची चावी हिस्कावन्याचा वारंवार प्रयत्न केला व भर चौकात त्यांचा अपमान केला, कोलते यांनी त्या दोघांना ताई व मॅडम संबोधित केले आणि पुरावे साठी फोटो व्हिडिओ घेऊन काही चुकीचे केले असेल तर माझी पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही तक्रार करू शकता असे सांगीतले.

परंतु त्यांनी अर्वाच्च् भाषा वापरत पत्रकार कोलते सोबत अधिकच वाद घातला. नंतर त्या महिला महाराष्ट्र सुरक्षा रक्षक बलाच्या महिला रक्षक असून नागपुर येथील मेयो हॉस्पिटल मध्ये कार्यरत असल्याची माहिती मिळाली. दुसर्‍यां दिवशी कोलते यांनी या घटनेची सदर पोलीस स्टेशनामध्ये रीतसर लेखी तक्रार दाखल केली.

ई- चालान व फौजदारी गुन्हे दाखल

कोलते यांच्या तक्रारी वरुन मसुबच्या त्या दोन्ही महिला रक्षकांवर विना हेलमेट वाहन चालविने प्रकरणी नागपुर वाहतूक पोलिस शाखेद्वारे पाचशे रुपये प्रति अशी ई चालानची कार्यवाही त्याच दिवशी करण्यात आली होती. सोबतच शिव्या व मारण्याची धमकी देने व बेकायदेशीर अडवनुक करने प्रकरणी त्या दोन्ही महिलां रक्षकांवर सदर पोलिस स्टेशन मध्ये भादंवीचें कलम 341, 504 व 506 नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर पोलिस स्टेशन नागपुर शहरचें वरिस्ठ पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांच्या आदेशानुसार पोलिस निरीक्षक भारती गुरनुले यांनी प्रकरणाचा तपास केला . पोलिसांद्वारे केलेल्या या अर्धवट कार्यवाहीशी समाधानी नसल्याचेही कोलते यांनी सांगितले .

सदर पोलीसांची भूमिका संदेहास्पद

घटनेचा व्हिडिओ व फोटो पाहता महाराष्ट्र सुरक्षा रक्षक बलच्या त्या दोन्ही महिला रक्षक हे कोलते यांना ‘ भाडित गेला पत्रकार , तो वीडीओ डिलीट कर नाहीतर कनपट शेकिन ‘ अशे अश्लील शिवी देत मारण्याची धमकी देताना व मोबाइल हिस्काविन्याचा वारंवार प्रयत्न करताना व्हिडिओ मध्ये अगदी स्पस्ट दिसत आहे.

यावरून त्या दोघींवर ‘ महाराष्ट्र प्रसारमाध्यमातील व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसक कृत्ये व व मालमत्तेचे नुकसान व हानी यांना प्रतिबंध) अधिनियम 2017 ‘ चे कलम 3 व 4 नुसार गुन्हा दाखल होने अपेक्षित होते. सोबतच मोबाइल हिस्काविन्याचा वारंवार प्रयत्न व मानहानि केल्या प्रकरणी कोणतीही कलम लावण्यात आली नाही.

बोलके पुरावे ,महिलांचे फोटो , त्यांचे कार्य स्थळ, वाहनाचे फोटो व दुचाकी वाहन क्रमांक सहित दिलेल्या तक्रारीवर एकूण आठ ते दहा दिवस तपास करूनही FIR वर वाहन चालक दोन्ही आरोपी महिलांचे नाव व पत्ता नमूद न करता फक्त अनोळखी आरोपीवर गुन्हा दाखल करून प्रकरण गुंडाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यावरून सदर पोलीसांनी त्या दोन्ही महिलांना बचावाची भूमिका घेतली की काय? असा प्रश्न उपस्थित झाल्याचा कोलते यांनी प्रतिक्रिया दिली.


इतकेच काय तर कोलते यांनी सदर पोलीस स्टेशनामध्ये दाखल केलेली व त्यावर पोलीस अधिकारीची रिमार्क नोट असलेली लेखी तक्रारीची प्रत सुद्धा स्थानिक काही राजकीय व अन्यत्र व्यक्तींना वॉटसअप द्वारे सार्वजनिक करण्यात आली. यामुळे तक्रार वापास घेऊन आपसात मिटवुन घेणे संबंधी स्थानिक काही राजकीय व्यक्ति , गुंड प्रवृत्तिचे व्यक्ति व काही निनांवी पत्रकारांचे विनंती व दमदाटी करणारे 40 ते 45 कॉल व मेसेज आल्याची कोलते यांनी माहिती दिली.

तक्रारीची व तक्रारदारांची गोपनीय माहिती पोलीस स्टेशन मधून सोशल मीडियाद्वारे सार्वजनिक करने ही अतिगंभीर व बेकायदेशीर बाब असल्याने यासंबंधि कोलते यांनी पोलिस विभागातील वरिटस्ठ अधिकाऱ्यांना लेखी तक्रार देवून दोषीवर कायदेशीर कार्यवाही करणेची मागणी केली आहे.

सोबतच तक्रारीवर असमाधानकारक कार्यवाही करने आणि तक्रार अर्ज सार्वजनिक गोपनीयता भंग करने प्रकरणी सदर पोलिस स्टेशन विरुद्ध मुंबई उच्च न्यायालय ,खंडपीठ नागपुर येथे फौजदारी याचीका दाखल करणार असल्याची माहिती कोलते यांनी प्रतिनिधीला दिली.

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहन्यायासाठी येथे क्लिक करा

Traffic Police

Leave a Reply