महसूल विभाग ची धडाकेबाज कारवाई, सहकारी साखर कारखान्यांचे जेसीबी व ट्रॅक्टर-ट्रेलर जप्त व दंड

Share
महसुल विभागाची धडाकेबाज कारवाई, सहकारी साखर कारखान्यांचे जेसीबी व ट्रॅक्टर-ट्रेलर जप्त व दंड
महसुल विभागाची धडाकेबाज कारवाई, सहकारी साखर कारखान्यांचे जेसीबी व ट्रॅक्टर-ट्रेलर जप्त व दंड

नेवासा/भेंडा– नेवासा तालुक्याचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा आणि मौजे भेंडे बुद्रुक येथील कामगार तलाठी महसूल विभाग यांनी गुरुवार दिनांक २२ जुलै २०२१ रोजी मौजे भेंडे बुद्रुक येथे अवैध गौण खनिज (मुरूम) उत्खनन करत असलेल्या जेसीबी व मुरूम वाहतूक करणारा टॅ्क्टर व ट्रेलर यावर निष्पक्षपातीपणे कारवाई केल्याने जिल्ह्यात सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत.

जिल्ह्यात राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक माजी आमदार घुले बंधु यांच्या लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना ली. ज्ञानेश्वरनगर या साखर कारखाना मालकीच्या जेसीबी व टॅ्क्टर वर जप्तीची कारवाई करण्यात आली. कारवाई करत असताना तहसीलदार उपस्थित कारखाना प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला परंतु तहसीलदार ने सर्व बाबींची खातरजमा करून वाहने जप्त करण्याचा धाडसी निर्णय घेतला.

प्राप्त माहितीनुसार दि.२२ जुलै रोजी मौजे भेंडे बुद्रुक तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर येथील महसूल विभाग कामगार तलाठी विजय जाधव हे नेवाश्याकडून भेंडे तलाठी कार्यालयात कामावर जात असतानाच MH-17 AE-9310 या क्रमांकाचे टॅ्क्टर व ट्रेलर मुरुमाची वाहतुक करताना निदर्शनास आले. सदर टॅ्क्टरचा पाठलाग केला असता तो लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना ली. ज्ञानेश्वरनगर मध्ये कारखान्याच्याच खासगी कामासाठी घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले. कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारात टॅ्क्टर व ट्रेलर अडवून कामगार तलाठी यांनी रॉयल्टी बाबत विचारणा केली असता टॅ्क्टर चालक यांच्याकडे शासकीय परवानगी असल्याचे अथवा रॉयल्टी आढळून आली नाही.

सदर मुरूम हा अनधिकृतपणे उत्खनन करण्यात येऊन खासगी वापरासाठी जात असल्याचे जाधव यांच्या लक्षात येताच भेंडे येथील कोतवाल सुभाष महाशिकारे व महसूल विभाग यांच्या मदतीने टॅ्क्टर व ट्रेलर ताब्यात घेण्यात आला व ज्या ठिकाणी प्रत्यक्षात उत्खनन सुरु होते त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता MH-17 BV-6784 या क्रमांकाचा जेसीबी उत्खनन करीत असल्याचे आढळुन आले. तलाठी जाधव यांनी तात्काळ नेवासा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना याबाबत माहिती कळविली व काही क्षणात नेवासा तहसीलदार उत्खनन करत असल्याच्या ठिकाणी हजर झाले.

तहसीलदार सुराणा यांनी उत्खनन करीत असलेल्या ठिकाणची व उत्खनन करून ज्या ठिकाणी मुरूम टाकण्यात येत होता त्या ठिकाणची स्वतः पाहणी केली. सर्व बाबींची खातरजमा केल्यानंतर तहसीलदार साहेबांनी जेसीबी आणि टॅ्क्टर व ट्रेलर मुद्देमालासाहित जप्त करण्याचे तात्काळ आदेश दिले.

नव नवीन माहिती

MH-17 BV-6784 या क्रमांकाचा जेसीबी व MH-17 AE-9310 या क्रमांकाचे टॅ्क्टर मा.तहसीलदार च्या आदेशानुसार जप्त करण्यात आलेले असून शासकीय नियमानुसार जेसीबी साठी ७,५८,४००/- व टॅ्क्टर साठी १,०८,४००/- असा एकूण दंड- ८,६६,८००/- रुपये. केल्याचे महसुल विभागाकडून सांगण्यात आले. जप्त करण्यात आलेली दोन्ही वाहने लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना ली. ज्ञानेश्वरनगर यांच्या मालकीचे असुन मा.तहसीलदार व कामगार तलाठी यांनी अचानक केलेल्या कारवाईचा तालुक्यातील अवैध उत्खनन करणाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे.

सदर कारवाईमुळे दि.२२ जुलै पासुन भेंडे परिसरातील मुरुमाची व इतर गौण खनिजाची चोरटी वाहतुक बंद झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. तहसीलदारकडून करण्यात आलेल्या धडाकेबाज व धाडसी कारवाईचे भेंडे परिसरात सर्वसामान्य नागरिकांनी स्वागत केले . या कार्यवाहित पंच म्हणून योगेश मिसाळ, वाघमारे,गायकवाड,गोरे यांचा सहभाग होता.

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आमदार पगार किती? तुमच्या टॅक्स चा पैसा

This Post Has 2 Comments

Leave a Reply