मुकुटबन पोलीस ठाणेदाराची बदली करून कारवाही करण्याची मागणी

Share
मुकुटबन ठाणेदाराची बदली करून कारवाही करण्याची मागणी पोलीस महा संचालकाकडे बेरोजगार युवकांनी दिली लेखी तक्रार.
मुकुटबन ठाणेदाराची बदली करून कारवाही करण्याची मागणी पोलीस महा संचालकाकडे बेरोजगार युवकांनी दिली लेखी तक्रार.

प्रतिनिधी: झरी जामनी – तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी एकत्र येत मुकुटबन परिसरातील कोळसा खदान आणि सिमेंट उद्योगामध्ये स्थानिक भूमि पुत्र, प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगार युवकांना प्रशिक्षण केंद्र उभारून त्यांना रोजगार उपलब्ध द्या. अशा मागणीचे निवेदन ७० ते ८० बेरोजगार युवकांनी कंपनी कडे केली. मात्र दोन दिवसानंतर एका कंपनी प्रशासनातील अधिकार्‍याच्या सांगण्यावरून मुकुटबन ठाणेदार धर्मा सोनुने यांनी निवेदनकर्त्याच्या नातेवाईकाला पोलीस स्टेशन मध्ये बोलवून . तुझ्या पुतण्यावर खंडणीचे गृहणे दाखल करून जबर युवकांना मारहाण करण्याची धमकी दिली. या घटनेमुळे सर्व निवेदनकर्त्या सुशिक्षित युवकांच्या मनात पोलीस प्रशासनातील अधिकार्‍याविषयी दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रक्षण करणारेच जर भक्षण करतील तर आह्मी जगावे कसे असा प्रश्न नागरिकांच्या मनात पडला आहे. घराबाहेर पडताना सुद्धा अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

झरी तालुक्यात आता पर्यंत ५ मोठ्या खाणी तसेच सीमेंट उधोग आहे. व भविष्यात सुद्धा अनेक कोळसा खदाणी आणि डोलोमाईन्स होणार हे निश्चित आहे. तालुक्यात कोळसा, चुनखडक, इतर धातुचा साठा भौगोलिक दृष्ट्‍या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध असल्याने अनेक मोठं भांडवलदार झरी तालुक्यात येत आहे. मोठं मोठे उधोग उभारून करोडोची कमाई करीत आहे.तरी सुद्धा येथील सुशिक्षित बेरोजगार तरुण हा उधोगमध्ये काम करण्यासाठी लागणारे शिक्षण घेऊनही बेरोजगार आहे.


काही युवक लोक प्रतिनिधी याना भेटून आपल्या समस्या सांगतात. पण लोक प्रतिनिधी सुद्धा त्याच्या रोजगाराच्या विषयावर बोलायला तयार नाही. त्यामुळे स्थानिक युवकांनी एकत्र येत कंपनी प्रशासनाला रोजगाराची निवेदनातून मागणी केली. पण स्थानिक पोलीस ठाणेदार यांचे कंपनीतील काही अधिकाऱ्यां सोबत अतिशय घनिष्ट असे संबंध असल्यामुळे कंपनी समोर १० ते १५ जरी युवक जमा झाले तरी सुद्धा पोलीस प्रशासनातील कर्मचारी हे तात्काळ हजर होतात. काही पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग कमी तर कँपनी मध्ये AC कॅबिन, व गाडीत जास्त दिसत असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे.

मुकुटबनमध्ये गोतस्करी, खुले आम दारू विक्री राजरोज पणे सुरू असते आहे.पण या सर्वांवर ठाणेदाराचा आशीर्वाद आहे. यामुळे अवैध धंदेवाल्याना पाठबळ मिळत आहे. मुकुटबन परिसरातील अवैध दारू ,गोतस्करीची माहिती देऊन सुद्धा कारवाही होत नाही.काही युवकांच्या मोबाईल मध्ये सुद्धा गोतस्करी ,व खुले आम दारू विक्री करतानाचे विडिओ आहे.अशी माहिती आहे.मुकुटबन पोलीस प्रशासनाचे घनिष्ठ संबंधामुळे कुणी पुहना तक्रार देण्यासाठी समोर येत नाही. मुकुटबन पोलीस स्टेशन मधील ठाणे दाराची CDR व पोलीस स्टेशन मधील CCTV फुटेज काढलयांतर सत्य समोर येऊ शकते.

नव नवीन माहिती

सामान्य बेरोजगार युवक आपल्या हक्कासाठी रोजगाराची मागणी करतात हे ठाणे दाराला खटकत असून आपले कंपनी सोबत असलेले चांगले संबंध टिकावे. व कंपनी कडून मलई खायला मिळावी. यासाठीच सुशिक्षित युवकावर खोटे गृनहणे दाखल करून मारहाण करण्याची धमकी दिली. असे निवेदन कर्त्या युवकात व परिसरातील नागरिकांत चर्चा रंगत आहे.

धमकीमुळे सर्व युवकांनी मुकुटबन येथील ठाणेदाराची तात्काळ बदली करून त्यांच्यावर कारवाही करावी. अशी मागणी यवतमाळ पोलीस अधीक्षक भुजबळ , पोलीस महा संचालक ,सचिव राज्य मानवी हक्क आयोगा कडे केली आहे.

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पोलीस कोठडी व न्यायालयीन कोठडी म्हणजे काय ❓

This Post Has 2 Comments

Leave a Reply