[ad_1]
मुंबई2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

- राज्याचे अधिवेशन नसून केवळ तीन पक्षांचे अधिवेशन
विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी अधिवेशनात प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि विरोधीपक्षाचे आमदार आमने-सामने आले. यांच्यात धक्काबुक्की झाल्याचेही पाहायला मिळाले. यावरुन भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच 12 आमदारांचे निलंबन केले तरीही आघाडीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.
…अन् कोल्ह्यासारखा पळ काढायचा
राणे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रात जटील, गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत. असे असताना सरकार दोन दिवसांचे अधिवेशन घेऊन पळ काढत आहे. अधिवेशनापूर्वी पञकार परिषद मुख्यमंत्र्यांनी घ्यायची असते माञ ते पळून गेले. त्यांना कोणतंही गांभीर्य नाही यामुळेच त्यांनी दोन दिवसांचे अधिवेशन ठेवले आहे. एका बाजूला स्वतःला वाघ म्हणून घ्यायचे आणि दुस-या बाजूने कोल्ह्यासारखा पळ काढायचा. हे सरकार फक्त भ्रष्टाचार करून पैसे कमवतायत. सरकारचा एक कलमी कार्यक्रम पैसे कमावणे आहे असा आरोपही राणेंनी केला आहे.
राज्याचे अधिवेशन नसून केवळ तीन पक्षांचे अधिवेशन
नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना सवाल केला आहे. ते म्हणाले की, लोकसभेचे अधिवेशन हे 19 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत असणार आहे. मात्र महाराष्ट्रात केवळ दोनच दिवसांचे अधिवेशन घेतले जाणार आहे. तसेच मुख्यमंत्री हे पत्रकार परिषद घेत नाहीत. शरद पवार यांना असा मुख्यमंत्री कसा चालतो? हे राज्याचे अधिवेशन नसून केवळ तीन पक्षांचे सरकार असल्याचे टीका राणेंनी केली आहे.
[ad_2]
Source link