[ad_1]
15 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

फ्रेंच ओपनमधून जपानच्या नाओमी ओसाकाने मानसिक आरोग्याच्या कारणामुळे माघार घेतली. याप्रकरणी मुग्धा व गायत्री दोघींनी ओसाकाचे समर्थन केले. गायत्रीने म्हटले की, खेळाडू सर्वप्रथम एक व्यक्ती आहे. त्याच्यासोबत त्याचप्रमाणे वागायला हवे. कोरोना नंतर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, क्वाॅरंटाइन, आयसोलेशनसह जो शब्द सर्वाधिक चर्चेत राहिला.
कोरोनामुळे १० ते ४० वयाेगटातील खेळाडूंच्या मनावर विपरीत परिणाम झाला. यातून मानसिक अाजाराने बाधित खेळाडू अाता सावरण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांकडे धाव घेत अाहेत. हा धाेका वेगाने वाढत असल्याने तज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात अाहे. टोकियो ऑलिम्पिक सुरू होण्यास ३२ दिवस शिल्लक आहेत. मात्र, अद्यापही त्याच्या आयोजनावर शंका कायम आहे. त्यामुळे खेळाडूंच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. मुग्धा बावरे आपल्या काळातील एक मोठी जलतरणपटू होती.
तिच्या नावे विविध वयोगटांतील स्पर्धेत ५०० पेक्षा अधिक सुवर्ण, ३०० रौप्य व २०० कांस्यपदके आहेत. १९९४-९५ मध्ये तिला राज्यातील सर्वोच्च शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला. मुग्धा आता अनेक खेळाडूंना मार्गदर्शन करते, माइंड स्पोर्ट्स नावाची संस्था चालवते. ‘कोरोनाचे आपलेच एक आव्हान आहे. मी एलिट खेळाडूंशी करार करते. हे सर्व जण कुटुंबीयांच्या आरोग्याची चिंता करतात. कोरोनाने सराव, स्पर्धेबाबत अद्याप अनिश्चितता अाहे.
बायो-बबलची डाेकेदुखी
बायो-बबलचा खेळाडूंच्या मनावर परिणाम पडला. भारतीय कर्णधार विराट कोहलीने देखील त्यावर प्रतिक्रिया दिली असून, त्याचा खेळाडूंवर कसा परिणाम होत आहे. त्याबाबत माजी भारतीय बॅडमिंटनपटू गायत्री वर्तक-मडकेकरने म्हटले की, ‘आपल्या सर्वांना फिरायला आवडते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत कोणीही त्यासाठी तयार नाही. सर्व जण पर्यायी मार्ग शोधत आहे.’ मुग्धाप्रमाणे गायत्रीही खेळाडूंच्या मानसिक आरोग्यावर काम करत आहे. प्रेक्षक नसल्यानेदेखील खेळाडू चिंतित आहेत, कारण चाहत्यांच्या प्रोत्साहनाने सर्वोत्कृष्ट योगदान देण्यास मदत मिळते.
[ad_2]
Source link