
मुंबई – माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र च्या वतीने राज्यभरातील कार्यकर्त्यांनी गेल्या आठ दिवसापूर्वी पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी देणगी निधी जमवला होता. सदर निधीमधून जीवन उपयोगी साहित्य खरेदी करून महाड तालुक्यातील ग्रामीण भागातील पिडीत व गरीब पूरग्रस्तांना मदतीचे वाटप महासंघाचे अध्यक्ष सुभाष बसवेकर, रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी तुकाराम कंठाळे, रघुनाथ कडू, पुरूषोत्तम पायकोळी व किरण मोरे यांचे हस्ते चार ऑगष्ट रोजी मदत वस्तूच्या कीटचे वाटप करण्यात आले.

महिती अधिकार कार्यकर्ता महासंघांच्या वॉटसअप ग्रुपवरती झालेल्या चर्चे प्रमाणे राज्य भरातील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे पुरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी जमा केला होता. या निधीमधून पुरग्रस्तांसाठी एक चटई, एक ताट वाटी व ग्लास, बेडशीट, मेनबत्ती बॉक्स, काडीपेटी बॉक्स, साबन, पेस्ट ब्रॅश, तेल, मच्छर अगरबत्ती इत्यादी १५ वस्तूंचा मदत कीट तयार केला होता.
असे एकूण शंभर किटस चे वाटप महाड तालुक्यातील असनपोई बौदधवस्ती, कामगार वसाहत तसेच सवादगांव कुभांरवाडा येथील गरीब व गरजू पुरगस्तांना चार ऑगष्ट २०२१ रोजी वाटप करण्यात आले.
जेव्हा एका माणसांवर नैसर्गिक संकट येत तेव्हा दुसरा माणूस मदतीला धावून जातो. ही संवेदनशीलता आपण सगळ्यांनी जपली पाहिजे.आपत्ती सांगून येत नाही पण संकटातील माणसांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम आपण निरंतर केलं पाहिजे असा विचार या प्रसंगी सुभाष बसवेकर यांनी व्यक्त केला.

पीडित माणसांच्या मदतीसाठी आरटीआय महासंघ सदैव तयार असेल असा विश्वास या प्रसंगी रायगड जिल्ह्याचे पदाधिकारी रघुनाथ कडू यांनी व्यक्त केला.
मदतीचे वाटत करण्यासाठी स्थानिक भागातील माजी सैनिक सुर्यकांत जगताप यांनी अतिशय सुंदर नियोजन केलें.
या प्रसंगी पीडित पुरग्रस्तांनीही देणगी दिलेल्या सर्व कार्यकर्त्याचे आभार मानले.
नव नवीन माहिती
- शिक्षक ग्रामसेवकांच्या विरोधात आंदोलन करतो म्हणून मारहाण कांगोणीच्या सरपंचासह ९ जणांवर गुन्हा दाखल.
- RTI महासंघची मागणी प्रत्येक शासकीय कार्यालयात शासनाच्या सर्व परिपत्रकांची काटेकोर अंमलबजावणी करावी
- RTI कलम ४ ख २१ दिवसात अद्यावत करा अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा
- माहिती अधिकार कार्यकर्ता मेळावा पुणे येथे संपन्न
- एकलहेरा ग्रामसेवकला माहिती अधिकाराचा दणका माहिती नाकारणे भोवले तत्कालीन ग्रामसेवक श्री. गायकवाड यांना ५०००/- रु दंड.
हे वाचले का?
- कुटुंब मालमत्ता व स्वतंत्र मालमत्ता म्हणजे काय?
- लोकशाही दिन..! कामचुकार अधिकारी यांना धडा शिकवण्याचा दिवस..!
- महसूल विभाग ची धडाकेबाज कारवाई, सहकारी साखर कारखान्यांचे जेसीबी व ट्रॅक्टर-ट्रेलर जप्त व दंड
- शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतचे बिनव्याजी पिककर्ज मिळणार , राज्य मंत्रिमंडळाची घोषणा.
- दप्तर दिरंगाई कायदा 2006
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा