शिक्षणाधिकारी यांच्यावर त्वरित कारवाई करा ; अन्यथा बेमुदत आमरण उपोषण

Share
माहिती अधिकार कार्यकर्ते राहुल वासनिक
माहिती अधिकार कार्यकर्ते राहुल वासनिक

शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यवाही न केल्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते राहुल वासनिक थेट जिल्हाधिकारी कार्यालया समोर दिनांक ८ जुलै २०२१ ला बेमुदत आमरण उपोषण…!

गडचिरोली:- शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे गणेश अलंकार विद्यालय निमगांव येथील मुख्यधापक यांची तक्रार देण्यात आली मात्र चार महिने लोटुनही कोणतीही चौकशी व कार्यवाही करण्यात आलेली नाही म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ते राहुल वासनिक यांनी थेट जिल्हाधिकारी यांना बेमुदत आमरण उपोषणाची नोटीस देण्यात आले.

प्रमुख मागण्या

  1. गणेश अलंकार विद्यालय निमगांव येथील चौकशी न करता आर्थिक गैरव्यवहार करुन प्रकरण दाबल्या बाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.
  2. महात्मा गांधी विद्यालय आरमोरी येथील चौकशी न करता आर्थिक गैरव्यवहार करुन प्रकरण दाबल्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.
  3. बोगस अप्रोलची चौकशी करण्यात यावी.
  4. जिजामाता हायस्कूल ईरुपटोला येथील चौकशी न करता आर्थिक गैरव्यवहार करुन प्रकरण दाबल्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.
  5. शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचा निलंबनाचा प्रस्ताव सादर करून चौकशी करण्यात यावी.

अशा विविध मागण्यासह दिनांक ५ जुलै २०२१ पर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास दिनांक ८ जुलै २०२१ ला दुपारी ठिक १:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल.

विना हेलमेट फोटो व्हिडिओ काढल्याने पत्रकार ला शिव्या व मारण्याची धमकी

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम |  YouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहन्यायासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply