जिल्हाधिकारी कार्यालया समोर RTI कार्यकर्ते राहुल वासनिक यांचे १ वाजता पासुन आमरण उपोषण सुरू

Share
राहुल वासनिक यांचे १ वाजता पासुन आमरण उपोषण सुरू

जिल्हाधिकारी कार्यालया समोर माहिती अधिकार कार्यकर्ते राहुल वासनिक यांचे १ वाजता पासुन आमरण उपोषण सुरू

गडचिरोली:- शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे गणेश अलंकार विद्यालय निमगांव येथील मुख्यधापक यांची तक्रार देण्यात आली मात्र चार महिने लोटुनही कोणतीही चौकशी व कार्यवाही करण्यात आलेली नाही म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ते राहुल वासनिक यांनी थेट जिल्हाधिकारी यांना बेमुदत आमरण उपोषणाची नोटीस देण्यात आले.

आमरण उपोषण प्रमुख मागण्या

(१)गणेश अलंकार विद्यालय निमगांव येथील चौकशी न करता आर्थिक गैरव्यवहार करुन प्रकरण दाबल्या बाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.

(२) महात्मा गांधी विद्यालय आरमोरी येथील चौकशी न करता आर्थिक गैरव्यवहार करुन प्रकरण दाबल्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.

(३) बोगस अप्रोलची चौकशी करण्यात यावी.

(४) जिजामाता हायस्कूल ईरुपटोला येथील चौकशी न करता आर्थिक गैरव्यवहार करुन प्रकरण दाबल्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. अशा मागण्यासह त्यांनी आज दुपारी १ वाजता पासुन बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली.

नवनवीन बातम्या

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील क्लिक करा

This Post Has One Comment

Leave a Reply