RTI कलम ४ ख २१ दिवसात अद्यावत करा अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा

Share
RTI कलम ४

RTI कलम ४ २१ दिवसात अद्यावत करा अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ पुणे

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ आपल्या देशामध्ये १२ ऑक्टोबर २००५ ला लागू झाला. हा कायदा लागू झाल्यापासून सर्व सार्वजनिक प्राधिकरणात १२० दिवसाच्या आत RTI कलम ४ ख १ ते १७ मुद्द्याची माहिती वेबसाईट वर प्रकाशित करायची होती.

शासकीय कारभारात पारदर्शकता यावी म्हणून या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. जेवढी माहिती शासकीय कार्यालय स्वतः हून प्रकाशित करतात. त्या कार्यालयांना माहिती अधिकार अर्ज खूप कमी प्रमाणात येतात.

शासनाने वेळोवेळी कलम ४ ची माहिती अद्यावत करण्यासाठी अनेक परिपत्रके प्रकाशित केली. तरीही आजही अनेक कार्यालयात कलम ४ ख अद्यावत नाही. त्यामुळे अनेक नागरिकांना मोठ्या प्रमाणात माहिती मिळविण्यासाठी त्रास होत आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ता मेळावा पुणे येथे संपन्न

पुणे राज्य माहिती आयोग कडे द्वितीय अपील ची संख्या वाढत आहे. द्वितीय अपील लवकर निकाली काढले जात नाही. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय च्या अंतर्गत १४ तहसील कार्यालय आहेत.

२०१५ पासून अनेक कार्यालयात कलम ४ ख अद्यावत केलेले नाही. कलम ४ ख ची माहिती वर्षातून २ वेळेस अद्यावत करायची आहे परंतु ७ वर्षापासून पुणे जिल्हाधिकारी अधीनस्त कार्यालयात माहिती अद्यावत नाही.

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ पुणे शाखा यांनी आज दिनांक २७ /६/२२ रोजी पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना कलम ४ ख १ ते १७ आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व कार्यालयात २१ दिवसात अद्यावत करावा अन्यथा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ पुणे आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करील अशा प्रकारचे निवेदन आज जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

जिल्हाधिकारी यांनी त्वरित यावर कार्यवाही करतो असे आश्वासन कार्यकर्त्यांना दिले. त्याची एक प्रत राज्य माहिती आयोग पुणे खंडपीठ यांना देण्यात आली आहे.

RTI कलम ४ ख ची माहिती पुण्यातील अनेक कार्यालयात अद्यावत झाली तर अनेक नागरिकांना माहिती मिळेल आणि माहिती अधिकार अर्ज कामी होतील.

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ पुणे अध्यक्ष अब्राहाम आढाव यांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना आपण वैयक्तिक लक्ष देवून सदर प्रकरण हाताळावे अशी विनंती केली.

सदर निवेदन देण्यासाठी अब्राहाम आढाव, राहुल अवचट, राहूल बानगुडे, युवराज पोटे, राम साठे, adv. प्रकाश दोंदे, Adv. उज्वला झेंडे, रमेश बोरुडे, जमील मिर्झा, इस्माईल शेख, विजयकुमार चव्हाण,खंडू अण्णा गव्हाणे,विलास डोंगरे,एस .डी.भोसले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर RTI कलम ४ ख २१ दिवसात अद्यावत न झाल्यास पुणे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ मोठ्या संख्येने आमरण उपोषण करणार आहे.

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply