
पुणे येथे माहिती अधिकार कार्यकर्ता मेळावा संपन्न माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, पुणे जिल्हा व शहर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन , पुणे येथे एकदिवसीय माहिती अधिकार कार्यकर्ता मेळावा व प्रशिक्षण शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.



कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली यावेळी पुणे विभागाच्या वतीने मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ मार्गदर्शक विवेक वेलणकर रस्ते , टोल , विद्युत वितरण कंपनी याबरोबरच माहिती अधिकार बाबतीत तर यशदाच्या प्रशिक्षक रेखा साळुंखे यांनी कायद्यातील विविध बाबींवर कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष शेखर कोलते यांनी संघटना , कार्यपद्धती , आव्हाने, खोटे गुन्हे, या बाबतीत मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष व महासंघाचे संस्थापक सुभाष बसवेकर यांनी कार्यकर्तांनी एकजुटीने कार्य करून माहिती अधिकार कायदा प्रत्येक नागरिकांनी अवगत करणे गरजेचे असुन



महिलांनीही या कायद्याचा अवलंब करण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली तसेच कार्यकर्त्यांना वर होणाऱ्या अन्याय भ्रष्टाचार याच्या विरुद्ध लढण्यासाठी मार्गदर्शन केले तसेच नियोजन समिती केलेल्या कार्याचे कौतुक केले, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रल्हाद कचरे यांनी कार्यकर्तांना आॕडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन केले, माहिती अधिकार कायद्याचा वापर करुन लोकहिताचे प्रश्नांना वाचा फोडल्याबद्दल “उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार ” प्रदान करण्यात आले.



सोशल मिडिया प्रमुख राहुल कदम यांनी सोशल मिडीयाचा योग्य वापर कसा करावा याबाबत कार्यकर्तांना मार्गदर्शन केले यावेळी संजय किणीकर , रामदास मोढवे , सुनिल गुजर आदिंनी अनुभव सांगितले.
कार्य शाळेसाठी पुणे जिल्हा बरोबरच सातारा, कोल्हापूर , सोलापूर, नगर , नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या मेळाव्याचे नियोजन राज्य कार्यकारणी सदस्य राहुलकुमार अवचट, अब्राहम आढाव, चंद्रकांत भवारी, राजेंद्र ढमढेरे, राहुल बानगुडे व पुणे शहर व जिल्हातील कार्यकर्त्यांनी केले.



राहुलकुमार अवचट यांनी जास्तीत जास्त कार्यकर्तांनी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघात सहभागी व्हावे असे आवाहन केले, यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना प्रमाणपत्र व कायद्याच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आब्राहम आढाव यांनी केले.
हे वाचले का?
- आपलं काम कुठे आणि कुणामुळे अडलंय याची माहिती अशी करून घ्या !
- सात दिवसांत अर्ज/फाइल वर काम होणार नाही तर अधिकारी यांच्यावर कारवाई होणार महाराष्ट्र सरकारचा निर्णय
- दप्तर दिरंगाई कायदा 2006
- मृत्युपत्र /Death Will म्हणजे काय? चला समजून घेऊया!
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा