शिक्षक ग्रामसेवकांच्या विरोधात आंदोलन करतो म्हणून मारहाण कांगोणीच्या सरपंचासह ९ जणांवर गुन्हा दाखल.

Share
शिक्षक ग्रामसेवकांच्या विरोधात आंदोलन

शिक्षक ग्रामसेवक गावात म्हणजेच मुख्यालयाचे ठिकाणी राहत नाही म्हणून शिक्षक ग्रामसेवकांच्या विरोधात आंदोलन करतो त्यांचे गाड्यांचे हवा सोडण्याचे आंदोलन करणारे RTI (माहिती अधिकार कार्यकर्ते) सोपान रावडे सहप्रचार प्रमुख नेवासा तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ यांच्या कुटुंबीयांना मारहाण केल्या प्रकरणी कांगोणीचे सरपंचासह नऊ व्यक्तींवर शनी-शिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत नामदेव आसाराम रावडे (रा.कांगोणी ता.नेवासा) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या FIR नुसार म्हटले की, माझा पुतण्या श्री.सोपान बाबासाहेब रावडे यानी शिक्षक, ग्रामसेवक, कृषी अधिकारी, डॉक्टर हे मुख्यालयाचे ठिकाणी राहत नाही म्हणून त्यांचे गाड्यांचे हवा सोडण्याचे आंदोलन चालु आहे.

आज दुपारी 12:00 वाजेच्या सुमारास आम्ही घरी असताना आमचे गावातील सरपंच आप्पासाहेब कारभारी शिंदे, सोमनाथ कातुरे, रविंद्र घुले, शेखर बोरूडे, संभाजी सोनवणे, दत्तात्रय बोरूडे, राजेंद्र कर्डीले, ज्ञानदेव भुसारी, एडके व इतर गावातील 100 ते 150 लोक जमून आले व तुम्ही शिक्षक ग्रामसेवकांच्या विरोधात आंदोलन करतो म्हणून असे म्हणून आम्हाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

सरपंच आप्पासाहेब शिंदे याने माझे तोंडावर बुक्का मारून मारहाण केली. संभाजी सोनवणे याने लाथाबुक्याने व काठीने मारहाण केली. नंतर माझा भाऊ बाबासाहेब आसाराम रावडे, रामदास आसाराम रावडे व भावजय असे सोडविण्यास आले असता वरील सर्वानी महिलाना सुद्धा लाथाबुक्याने मारहाण केली.

या फिर्यादी वरून शनी-शिंगणापूर पोलीस ठाण्यात वरील सर्वांवर कलम 143,147,148,149,452,504,506, 37(1), 37(3),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply