ग्रामसेवक चा प्रताप तामसा गावात शिरला भूखंडाचा हिवताप.

Share
तामसा ग्रामसेवक चा प्रताप
तामसा ग्रामसेवकाचा प्रताप

नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या तामसा ग्रामपंचायत मध्ये सध्या ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीच्या जागेचा भूखंड जिल्हा भरात चर्चेचा विषय ठरला आहे. तामसा नगरीचे सध्याचे कार्यरत सरपंच याच्या नातेवाईकांच्या नावावर देखील जागेचे न.नं 8 करण्यात आले.

त्या जागेवर सप्टेंबर व ऑक्टोबर 2020 आर.सी.सी. चे पक्के बांधकाम सुध्दा करण्यात आले आहे .डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील एक व अण्णा भाऊ साठे समाज मंदिरासमोरील रिकामी जागा येथे दोन ग्रामपंचायत सदस्यांच्या व परिवाराच्या नावे तर एका व्यापार्‍याच्या नावे भाडे तत्त्वावर देऊन नमुना नंबर आठ करून दिले. या व्यतिरिक्त मुख्य रस्त्यावरील इतर बर्याच ठिकाणी ग्रामपंचायतीच्या रिकाम्या जागेचे. ग्राम विकास अधिकार्‍याने करोड रूपयांची जागा स्वत:च्या पोळ्या भाजण्यासाठी भाडे तत्त्वावर दिल्या.

विषय एवढ्यावरच थांबत नाहीतर. त्या जागेचे नमुना नंबर आठ तयार करून द्यायला विसरले नाहीत. मागील ग्रा. पं. सार्वत्रिक निवडणुकी नंतर प्रशासकीय कार्यकाळ लागू झाला होता. त्यावेळी प्रशासकीय अधिकारी व ग्राम सेवक यांनी मनमानी पद्धतीने तामसा ग्रामपंचायतीच्या मुख्य रस्त्यावरील भाडे तत्त्वावर दिलेल्या जागेवर बांधकाम करण्यासाठी आर्थिक हस्तांदोलन करून तोंडी परवानगी दिली त्याचाच फायदा घेत.

RCC चे एक, दोन, तीन मजली.10 ते 12 भाडेकरुनि मोठे व पक्के बांधकाम केले आहे. याविषयी आठ ते नऊ सामाजिक कार्यकर्त्यांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. त्यावर चौकशी समिती नेमली होती परंतु चौकशीचा अहवाल आल्यानंतर ते प्रकरण तिथेच शांत झाले कोणावर ही कुठल्याच प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही.

याव्यतिरिक्त तामसा ते आष्टी रोड वरील वार्ड क्रमांक सहा येथे तर ग्राम विकास अधिकारी यांनी चक्क सार्वजनिक रस्त्याचे 7 प्लाॅटचे नमुना नंबर आठ तयार करून संबंधित दिले. याशिवाय शासनाच्या विविध विकास निधीच्या निधीचे देखील तिन तेरा वाजवले आहे.

तामसा शहरातील पूर्वीचे व जुने विद्युत पंप दाखवून. नवीन विद्युत पंपांचे बिल तयार करून निधी हडप केला आहे.याशिवाय तामसा शहरातील एल.ई.डी.लाईट, दलित वस्तीचे हायमॅक्स व शहरातील इतर हाय मॅक्सच्या चौकशी सह अपंग निधी 14 वा वित्त आयोग 15 वा वित्त आयोग जिल्हा परिषद,आमदार, खासदार,राज्य व केंद्र शासनाच्या निधीची चौकशी, आजपर्यंत शहरात करण्यात आलेले छोटे मोठे उड्डाणपूल.

नाव नवीन माहिती

दलित वस्तीतील सीसी रस्ते, विंधण विहिरी/ बोर भूमिगत नाल्या, रस्ते, इतर कोठ्यातील विंधण विहिरी/ बोर भूमिगत नाल्या, रोज बाजार, आठवडी बाजाराच्या जमा रकम व विनियोगाची चौकशी सह 1 जानेवारी 2019 ते आज रोजी पर्यंत मुख्य रस्त्यावरील ग्रामपंचायतीच्या जागेची.

ग्रामसेवक यांनी केलेल्या नमुना नंबर 8 ची व भाडे तत्त्वावर जागा घेणार्‍या न.नं.आठ धारकांच्या नावाची तपासणी सह बँक खात्याचे स्टेटमेंट, कॅश बुक, ठराव, प्रोसिडिंगसह विविध कामा संदर्भात देण्यात आलेल्या चेक संदर्भात चौकशी करावी.

या ग्रामसेवक महोदयांचे बरेच वेळा निलंबन झाल्याचे समजते. त्यामुळे संबंधित भ्रष्ट ग्राम विकास अधिकारी आनंद शेळके, सरपंच व त्यांची पाठ राखण करणारे गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, जिल्हा कार्यकारी अभियंता ,यांच्यासह संपूर्ण संबंधित अधिकारी कर्मचारी यांची देखील.

संपूर्ण कागदपत्रांसह, खाते निहाय. आणि विभागीय चौकशी तक्रारकर्ता समक्ष करून चौकशीचा अहवाल जागेवरच तक्रारकर्ता देण्यात यावा. अशी मागणी तक्रारकर्त्या निवेदनाद्वारा केली आहे. आणि चौकशी अंती. भ्रष्ट अधिकारी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची रिकवरी करून शासन खाती जमा करण्यात यावी.

भ्रष्टाचारी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी. अन्यथा कायदेशीर मार्गाचा अवलंब करीत ग्रामस्थांसह सार्वजनिक आंदोलन अथवा आमरण उपोषण करणार असल्याचे तक्रारी निवेदन. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण वाघमारे तामसा यांनी नांदेड जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी. श्रिमति वर्षा ठाकुर/घुगे. जिल्हा अधिकारी.विभागिय आयुक्तांकडे केली. नांदेड जिल्ह्याच्या सिईओ मॅडम सह.वरिष्ठ अधिकारी काय कार्यवाही करणार या कडे संबंध तामसा वासियांसह नांदेड जिल्हाचे लक्ष लागले आहे.

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

This Post Has One Comment

Leave a Reply