Tokiyo olympic updates: Cautious play against Corona Separate trials of unvaccinated players; news and live updates | कोरोनाविरुद्ध सावध खेळी; लसीकरण न केलेल्या खेळाडूंची वेगळी ट्रायल

Share

[ad_1]

  • Marathi News
  • Sports
  • Tokiyo Olympic Updates: Cautious Play Against Corona Separate Trials Of Unvaccinated Players; News And Live Updates

9 दिवसांपूर्वीलेखक: मोहम्मद अली

  • कॉपी लिंक
  • अमेरिकन 414 खेळाडूंची झाली टेस्ट; सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह

अमेरिका हा अाॅलिम्पिकमधील सर्वात बलाढ्य संघ मानला जाताे. त्यामुळे अापले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी कसून मेहनतीसह अमेरिका संघाने काेराेनाबाबतच्या नियमाचे काटेकाेरपणे पालन करण्यावर अधिक भर दिला. त्यामुळे महामारीची खबरदारी घेत अमेरिका संघाने लसीकरण न झालेल्या खेळाडूंची वेगळी ट्रायल घेतली. ‘आम्ही या चाचणीला ‘जर्नी टू गोल्ड-टोकियो आउटडोअर सिरीज’असे नाव दिले आहे. हे संपूर्ण नियोजन खेळाडूंचे कोरोनापासून सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने बनवले आहेत. त्याला ऑलिम्पिकची पूर्व चाचणी असेही म्हटले जाते,अशी माहिती यूएसए ट्रॅक अँड फील्डचे सीईओ मॅक्स सीगल यांनी दिली.

२ हजार काेटीतून स्टेडियमचे नूतनीकरण
कोरोनापासून बचावासाठी हेवर्ड फील्ड स्टेडियमची विभागणी झाली. एक गटात लस घेतलेल्या खेळाडूंची व दुसऱ्या गटात लस न घेतलेल्या खेळाडूंची चाचणी घेतली. अमेरिकन संघटनेने ऑलिम्पिकला जाणाऱ्या खेळाडूंसाठी लस बंधनकारक केली नाही. प्रेक्षकांची आसन व्यवस्था ही लस घेतलेल्या आणि न घेतलेल्या अशा दोन पद्धतीत केली आहे.

अाॅलिम्पिकदरम्यान महामारीचा धाेका कायम
युनिव्हर्सिटी ऑफ मिनिसोटा आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या तज्ज्ञांनुसार, जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक स्पर्धेदरम्यान कोरोनापासून बचावासाठी आवश्यक पावले उचलण्यात आलेली नाहीत. अमेरिकेच्या अनेक आरोग्य तज्ज्ञांच्या मते महामारीदरम्यान ऑलिम्पिकचे आयोजन सुरक्षित नाही.

इव्हंेटमधील जाेखमीची विभागणी
आम्ही खेळाडूच्या तयारीसाठी इव्हेंटमधील जाेखमीची तीन गटात विभागणी केली. त्यानुसार कमी धोका, मध्यम धोका, तीव्र धोका, असे गट केले. भालाफेक कमी धोक्याच्या गटात येतो. धावण्यात १०० व २०० मीटर प्रकारात खेळाडू आपल्या लेनमध्ये धावतात, त्यामध्ये फिजिकल डिस्टन्सिंग कायम असते. या प्रकारांचा समावेश मध्यम धोक्याच्या गटात आहे. लांब पल्ल्याच्या शर्यतीचा तीव्र धोक्याच्या गटात समावेश अाहे.

बातम्या आणखी आहेत…

[ad_2]

Source link

Leave a Reply